Pune Crime News | नवले पुल परिसरात पुन्हा भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यु

Pune Crime News | Speeding truck hits 6 vehicles again in Navale bridge area, two-wheeler rider dies

पुणे : Pune Crime News | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात शुक्रवारी एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातात ६ वाहनांचे नुकसान झाले.

https://www.instagram.com/p/DV0xqwDCY5Z

आशफाक हनीफ चौधरी (वय ३५,  रा. अश्रफनगर, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांचा भाचा अल्ताफ लियाकतअली भेलमे (वय ३०, रा. अश्रफनगर, कोंढवा) यांनी नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक शंकर गोपळाराव मेडेबने (वय ३३, रा. बसवकल्याण, कर्नाटक) याला अटक केली आहे.  हा अपघात कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणार्‍या सिग्नलवर शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील एक ट्रक फरशी घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. कात्रज बोगद्याकडून येत असताना तीव्र उतारावर त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे सिग्नलला थांबलेल्या वाहनांना त्याने एकामागोमाग धडक दिली. त्यात ५ वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अशफाक चौधरी हे डीएसके येथे चालक म्हणून काम करतात. ते दुचाकीवरुन कामाला जात होते. त्यांच्या दुचाकीवरुन ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

नर्‍हे पोलिसांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून रस्ता सुरळीत करुन दिला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक पळून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.

You may have missed