Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन लग्नाच्या बैठकीत जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या तरुणावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. लग्नाबाबतच्या बैठकीमध्ये जातीवाचक शिवीगाळ करुन शोषण करणार्‍या तरुणावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ३३ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय संदिप बागुल Akshay Sandeep Bagul (वय ३३, रा. साई पार्क सोसायटी, त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ) यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२३ पासून ऑक्टोंबर २०२५ दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन  तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. मोबाईल फोनवर पॉर्न व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक संबंध ठेवले. फिर्यादीसोबत भांडणे करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लग्नाबाबत बैठकीमध्ये अक्षय बागुल याने जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतरही फिर्यादी यांनी लग्नाबाबत त्याची वाट पाहिली. अक्षय बागुल याने लग्नास नकार देऊन तिची शारीरीक, आर्थिक व मानसिक शोषण केल्याने शेवटी तिने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे तपास करीत आहेत.

You may have missed