Pune Crime News | लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करणार्‍या डमी उमेदवारांवर गुन्हा दाखल, लागोपाठ दोन दिवस एकच उमेदवार दोघांच्या नावाने देत होता परिक्षा

crime

पुणे : Pune Crime News | लष्करातील कुक पदासाठीच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करुन डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

याबाबत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन चे जनरल रिर्झव्ह इंजिनिअरींग फोर्सचे कमलु उमाकांत नारायणासा यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साहिल करणसिंग (वय २३, रा. थुआ, ता. अलेवा, जि. जिंद, हरियाना), शिवा राजकुमार (वय २३, रा. उरावर, ता. शेषागंज, जि. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार धानोरी रोडवरील भैरवनगर येथील ग्रेफ सेंटर बी आर ओ येथे १२ मार्च रोजी सकाळी सहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनगरयेथील ग्रीफ सेंटर बी आर ओ गेट येथे मसएस डब्ल्यु कुक वर्ग ३ पदासाठी लेखी परिक्षा घेतली जात आहे. १२ मार्च रोजी ७६६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी आले होते. परिक्षेची बायोमेट्रीक पद्धतीने तपासणी केली जाते. उमेदवार याचे ओळखपत्र पाहुन खात्री करुन त्यांना परीक्षेसाठी रुममध्ये पाठविले.  रिक्युरिटींग बटालीयनचे कमांडर पी अरविंद हे उमेदवाराचे ओळखपत्र तपासून त्यांना परीक्षेस बसवत असतात. पी अरविंद यांना निर्दशनास आले की काही उमेदवार हे  डमी  उमेदवार म्हणून परिक्षेस आलेले आहेत.

त्यांनी त्या उमेदवारांना बाजुला घेत चौकशी केली. त्यात डुमरखा खुर्द (जिंद, हरियाना) या उमेदवाराच्या जागेवर डमी उमेदवार म्हणून साहिल करणसिंग हा बसला होता. तसेच उमेदवार प्रमोद कुमार याच्या नावाने शिवा राजकुमार हा  डमी उमेदवार म्हणून बसला होता. तसेच शिवा राजकुमार याने १० मार्च रोजी बीआरओमधील एमएस डब्ल्यु कुक या परिक्षेत राजीव अशोक कुमार यादव (वय २०, रा. उरावर, ता. सिरसागंज, जि. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) या उमेदवाराच्या नावाने डम्मी उमेदवार म्हणून बसल्याचे दिसून आले. दुसर्‍याच्या नावाने परीक्षा देऊन शासनाची फसवणूक करणार्‍या दोघांना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक लाखे तपास करीत आहेत.

You may have missed