Protest Against Wine Shop In Pune | पुणे : नरपतगिरी चौकातील वाईन शॉप बंद करण्यासाठी समर्थ पोलीस स्टेशन येथे आंदोलन (Video)
पुणे : Protest Against Wine Shop In Pune | शुक्रवार, दिनांक 13 मार्च 2026 रोजी पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24-अ मधील नगरसेविका कल्पनाताई दिलीपमामा बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशन येथे आंदोलन करण्यात आले.
नरपतगिरी चौक येथील अमर वाईन शॉप या दारू दुकानामुळे स्थानिक रहिवासी, महिला आणि लहान मुले-मुलींना गेल्या अनेक वर्षांपासून त्रास होत असल्याचा आरोप करत ते तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या वाईन शॉपमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. हे आंदोलनाचा दुसरा दिवस असून, येणाऱ्या काळात वाईन शॉप बंद न झाल्यास मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. इतक्या वर्षापासूनच्या त्रासाला वाचा फोडण्याचा प्रयत्न कल्पनामामी आणि दिलीपमामा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
