LPG Gas Shortage | महाराष्ट्रात घरगुती LPG सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही; राज्य सरकारची ग्वाही

LPG Cylinder Price Hike | Commercial LPG cylinder prices hiked again; Prices hiked in major cities including Delhi, Mumbai

मुंबई : LPG Gas Shortage | मध्य पूर्वेतील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला असून, राज्यात घरगुती एलपीजी (LPG) गॅसचा कोणताही तुटवडा भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी आयात विस्कळीत झाली असली, तरी भारताने स्थानिक पातळीवर खबरदारीचे उपाय योजले आहेत.

गेल्या दोन दिवसांत घरगुती गॅसचे दैनिक उत्पादन वाढवून ते ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत नेण्यात आले आहे, ज्यामुळे घरगुती ग्राहकांसाठीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे. केंद्र सरकारने सध्या ‘व्यावसायिक’ वापराऐवजी ‘घरगुती’ गॅस पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे. याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर काही प्रमाणात होत असून व्यावसायिक सिलिंडरची टंचाई जाणवू शकते, परंतु सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकाच्या गॅसवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

तसेच, गॅस सिलिंडरची अनावश्यक साठेबाजी टाळण्यासाठी प्रशासनाने रिफिल बुकिंगच्या नियमांत तात्पुरते बदल केले आहेत. दोन सिलिंडरमधील अंतर वाढवण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त सिलिंडर बुक करू नयेत, असे आवाहन सरकारने केले आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठाही पुढील ४५ ते ५० दिवसांसाठी पुरेसा उपलब्ध असल्याने इंधन टंचाईची सध्यातरी कोणतीही शक्यता नाही. सोशल मीडियावरील अफवांकडे दुर्लक्ष करून संयम राखण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

You may have missed