Pune Crime News | ‘‘तुमच्या मुलाला मारुन टाकले, त्याला घेऊन जा’’ मारेकऱ्यांनी आईला फोन करुन सांगितले; अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तिच्या नातेवाईकांनी तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन केला खून

Pune Crime News | "They killed your son, take him away" the killers called the mother and told her; The minor girl's relatives opposed her friendship and brutally beat the young man to death with a wooden stick

पुणे : Pune Crime News |  अल्पवयीन मुलीच्या मैत्रीला विरोध करुन तिला तरुणाला घरी बोलावण्यास लावले.  तो टेरेसवर आल्याने तिच्या नातेवाईकांनी लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन तरुणाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोथरुड पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नागेश संजय जाधव (वय २३, रा. जुनी वडारवाडी, मंजाळकर चौक, शिवाजीनगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत त्यांची आई सुरेखा संजय जाधव (वय ४५, रा. जुनी वडारवाडी) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वृषाली अनिल शिंदे Vrushali Anil Shinde (वय ३४),  सुनिता सुनिल शिंदे Sunita Sunil Shinde (वय ४०),  जयश्री लक्ष्मण शिंदे Jayshree Laxman Shinde (वय ३१), तुळशी योगेश शिंदे Tulshi Yogesh Shinde (वय २४) गंगा संजय पवार Ganga Sanjay Pawar (वय ४५) अनिल शामराव शिंदे Anil Shyamrao Shinde (वय ३९, सर्व रा. मेघासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरुड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  माणिक संजय पवार (Manik Sanjay Pawar), सुनिल शिंदे, पोपट शिंदे, योगेश शिंदे, (सर्व रा. मेगासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मेगासिटी येथील टेरेसवर शनिवारी रात्री ८ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर येथील एका कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. त्याचे मेगासिटी येथे राहणार्‍या तरुणीबरोबर मैत्री होती. ते एकमेकांशी मोबाईलवरुन संपर्कात होते. १४ मार्च रोजी सायंकाळी सव्वासात वाजता नागेश याला फोन आला. त्यानंतर तो मोटारसायकलवरुन घरातून निघून गेला. रात्री ८ वाजता त्याच्या मोबाईलवरुन त्याची आई फिर्यादी सुरेखा जाधव यांना फोन आला. फोनवर बोलणार्‍याने तुमचा मुलगा नागेश हा मेगासिटी येथे आहे. आम्ही त्याला मारले आहे. तुम्ही १० मिनिटात येथे येऊन मुलाला घेऊन जा, नाही तर आम्ही त्याला खाली टाकून देऊ, असे म्हणून फोन बंद केला. त्यानंतर फिर्यादी या तातडीने मेगासिटी येथे गेल्या.

तेथे खूप गर्दी जमली होती. त्या टेरेसवर गेल्या. त्यांचा मुलगा नागेश हा खाली पडला होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. त्याला महिला मारहाण करीत होत्या. त्यांनी इतरांच्या मदतीने त्याला रिक्षातून रत्ना हॉस्पिटलमध्ये आणले. वाटेत त्याने आपल्या आईला सांगितले की, माझी एका मुलीबरोबर मैत्री होती. आम्ही एकमेकांसोबत फोनवर बोलत होतो. तिने त्याला फोन करुन तिच्या घरी बोलावून घेतले होते. तेथे गेल्यावर तिची आई, चुलत्या व इतरांनी मिळून नागेश याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रत्ना हॉस्पिटलने त्यांना ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ससून रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरु असताना नागेश याचा मृत्यु झाला. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

You may have missed