Pimpri Crime News | खंडणीसाठी अपहरण करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद, सव्वापाच लाखांचा माल जप्त करुन 3 गुन्हे आणले उघडकीस

Pimpri Crime News | Anti-Extortion Squad arrests two innkeepers who were kidnapping for ransom, seizes goods worth Rs. 5.25 lakh and uncovers 3 crimes

पुणे/ पिंपरी : Pimpri Crime News | मारहाण करुन तरुणाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख १६ हजार रुपयांचा माल जप्त करुन २ खंडणीचे व १ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पवन छगन उजगरे Pawan Chhagan Ujagre (वय २६, रा. समता कॉलनी, धनगरबाबा मंदिराशेजारी, काळेवाडी) आणि सुमित हनुमंत कराड Sumeet Hanumant Karad (वय २८, रा. ज्ञानेश्वरी पार्क, दिघी रोड, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षण कक्षाला सुरज ज्ञानेश्वर शेलार (वय ३२) यांना मारहाण करुन  त्यांचे अपहरण केले आहे. त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे, असा फोन १६ मार्च रोजी आला होता. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने फोन करणार्‍या साजन शेलार (रा. भोसरी) यांच्याकडे चौकशी केल्यावर सुरज शेलार यांना पवन उजगरे व सुमित कराड यांनी पैशांची मागणी करुन रिक्षातून पळून नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याचदरम्यान, नितीन शामकांत महाजन (वय ३५) हे १५ मार्च रोजी रात्री दीड वाजता नाशिक फाटा येथून सांगवी येथे जात असताना दोघांनी त्यांना साई चौक, सांगवी येथे जायचे असल्याचे सांगून रिक्षामध्ये बसवुन त्यांना घरी न सोडता त्याचे रिक्षातून पिंपळे गुरव येथील ८ टु ८० पार्क गार्डनचे बाजूला मोकळ्या मैदानात नेऊन कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करुन पॅन्टच्या खिशातील मोबाईल व रोकड जबरदस्तीन काढून घेतली. फोन पेचा पासवर्ड घेऊन त्यांच्या फोनद्वारे १४ हजार ८१० रुपये वेगवेगळ्या फोन पे ला ट्रान्सफर केली. सांगवी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता.

या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे दोन रिक्षामधून भोसरी एमआयडीसी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन त्यांचा शोध घेत असताना दोन जण वेगवेगळ्या दोन रिक्षा घेऊन भोसरी एमआयडीसीतील अर्थ केअर इक्युटमेंट कंपनी शेजारील मैदानात थांबल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जबरी चोरी केलेले मोबाईल, २ कोयते आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन रिक्षा, रोख रक्कम असा ५ लाख १६ हजार ९० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

अधिक चौकशीमध्ये भोसरी, सांगवी येथील खंडणीचे २ गुन्हे व एक जबरी चोरीचा असे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, चंद्रकांत जाधव, किशोर कांबळे, दादाभाऊ साबळे, भरत गाडे यांनी केली आहे.

You may have missed