Pune Crime News | हळदीच्या पाकिटात लपवून गांजाची विक्री करणार्‍या दोघा भावांना बाणेर पोलिसांनी केली अटक, घरझडतीत मिळाला 16 किलो गांजा

Pune Crime News | Baner police arrest two brothers for selling ganja hidden in turmeric packets, 16 kg ganja found in house search

पुणे : Pune Crime News | त्यांच्या सॅकमध्ये हळदीची पाकिटे होती़ वरुन पाहणार्‍यांना ती हळदीची पाकिटे असल्याचे वाटत होते. प्रत्यक्षात त्यात गांजा होता. बाणेर पोलिसांनी ज्युपिटर हॉस्टिपल जवळ दोघांना पकडून त्यांच्याकडून ३ किलो गांजा जप्त केला. चिंचवडमधील चाफेकर चौक येथील घराची झडती घेतली असता तेथे १३ किलो गांजा मिळून आला. दोघांकडून एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DWGl0VJCeQf

मध्यप्रदेशातील पण धुळे जिल्ह्याच्या सीमेवर राहणारे हे दोघे अनेक दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होते. तेथून ते गांजांची तस्करी करुन पुण्यात आणून त्याची विक्री करत होते. दोघा भावांपैकी एकाने बिझनेस अ‍ॅडमिनिस्टेशनचे शिक्षण घेतले आहे. त्याचा वापर त्याने चांगल्या व्यवसायात करण्याऐवजी गांजाच्या तस्करीच्या व्यवसायात केल्याचे दिसून आले.

अभिषेक भिका बोरसे Abhishek Bhikka Borse (वय २४), अक्षय भिका बोरसे Akshay Bhikha Borse (वय २९, दोघे रा. चाफेकर चौक, चिंचवड) अशी या तस्करांची नावे आहेत.

याबाबत पोलीस हवालदार गणेश गायकवाड यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक अलका सरग यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर, कैलास दाबेराव, पोलीस हवालदार संदेश निकाळजे, गणेश गायकवाड, पोलीस अंमलदार स्वप्नील मराठे, शरद राऊत यांना कार्यालयात बोलावले. त्यांना अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथक ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात तपासणी सुरु केली. त्यावेळी जलतरण तलावाच्या मागील रोडवर दुचाकीवर दोघे जण ग्राहकाची वाट पहात थांबले असल्याने दिसले. पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या सॅकची झडती घेतली. त्यात हळद पावडरची पिशवी होती. या पिशवीचा वास घेऊन पाहिले असता त्याला गांजासारखा वास येत होता. पोलिसांनी त्यांच्याकडून २ किलो ९७० ग्रॅम गांजा, थायलंड, सिंगापूरच्या चलनी नोटा, मोबाईल, दुचाकी असा २ लाख २० हजार ९८० रुपयांचा माल जप्त केला. चिंचवडमधील चाफेकर चौकातील भाड्याच्या घराची झडती घेतली. त्यात आणखी १३ किलो गांजा आढळून आला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश रायकर तपास करीत आहेत.

You may have missed