Pune Traffic Updates | हडपसरजवळ मुठा कालवा फुटल्याने परिसर जलमय; मगरपट्टा -मुंढवा रोडवरील वाहतूक ठप्प, 10 तास पाणी राहण्याची शक्यता

Pune Traffic Updates | Area flooded due to Mutha canal burst near Hadapsar; Traffic on Magarpatta-Mundhwa road halted, water likely to remain for 10 hours

पुणे : Pune Traffic Updates | खडकवासल्याहून निघणारा मुठा कालवा हडपसर जवळील मगरपट्टा परिसरात फुटल्याने ते कालव्यातील सर्व पाणी मगरपट्टा परिसरात पसरले आहे. त्यामुळे मगरपट्टा – मुंढवा रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. खडकवासला येथून कालवा बंद केला असला तरी हे सर्व पाणी वाहून जाण्यासाठी किमान १० तास लागणार आहे. त्यामुळे पुढील काही तास मगरपट्टा  -मुंढवा रोडवरील वाहतूक ठप्प राहण्याची शक्यता असून नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/DWN3ubxibnH

नागरिकांसाठी पर्यायी मार्ग

१) वैदुवाडी चौक – शिंदे वस्ती – शिर्के रोड – जहांगीर नगर चौक – ताडीगुत्ता मार्गे – मुंढवा चौक

२) 93 अव्हेन्यू मॉल / काळुबाई चौक – बी.टी. कवडे रोड – घोरपडी -फ्लावर – पिंगळे वस्ती – ताडीगुत्ता चौक – मुंढवा चौक

३) खराडी कडून येणाºयांसाठी:

मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक – पिंगळे वस्ती – घोरपडी रेल्वे फ्लायओव्हर – बी.टी. कवडे रोड – (डावीकडे वळून) हडपसर

४) मुंढवा चौक – ताडीगुत्ता चौक – जहांगीर नगर – बी.जी. शिर्के रोड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – (डावीकडे) शिंदे वस्ती – हडपसर इंडस्ट्रियल एरिया – वैदुवाडी चौक – सोलापूर हायवे

५) सोलापूर रोड कडून येणार्‍यांसाठी:
१५ नंबर – मांजरी – झेड कॉर्नर – लोणकर वस्ती – केशवनगर – मुंढवा चौक

You may have missed