Mohan Joshi Pune Crongress | सरकारने हॉटेल व्यावसायिकांची फसवणूक थांबवावी; गॅस सिलींडर तातडीने द्या अन्यथा आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी
पुणे : Mohan Joshi Pune Crongress | व्यावसायिक गॅस सिलींडर वरील २० टक्के निर्बंध सोमवार दि . २३ पासून उठविण्याची घोषणा मोदी सरकारने केली .प्रत्यक्षात सिलींडर मिळालेच नाहीत . ही फसवणूक थांबवावी आणि उद्या मंगळवार पासून हॉटेल व्यावसायिकांना सिलींडर पुरवावेत अन्यथा आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज सोमवारी दिला .
शहरातील विविध भागातील हॉटेल मालक , खानावळींचे मालक यांच्याशी चर्चा केली . गॅस सिलींडर मिळालेच नाही असे समजले . जिल्हा प्रशासनाकडेही व्यावसायिक गॅस सिलींडरवरील निर्बंध शिथील केल्याचे आदेश आले नव्हते अशीही माहिती मिळाल्याचे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे .
हॉटेल आणि खाद्य पदार्थांच्या व्यवसायावर हजारो लोक अवलंबून आहेत .सोमवारपासून निर्बंध शिथील होतील आणि व्यवसायाला थोडा हातभार लागेल अशी आशा होती . आता मात्र सरकारने एकही दिवस न दवडता हॉटेल खानावळी आदींसाठी गॅस सिलींडर द्यावेत . अन्यथा काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला आहे .
