Pune Crime News | मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरुन तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन केले गंभीर जखमी, बिबवेवाडी पोलिसांनी 2 जणांना केली अटक
पुणे : Pune Crime News | आईबरोबर घरी पायी जात असताना टोळक्याने तरुणाला अडवून माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतो, असे म्हणून त्यांनी लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात मारहाण करुन गंभीर जखमी केले़ बिबवेवाडी पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.
हरिष विनोद कदम (वय २०, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुषार अमित तळेकर Tushar Amit Talekar (वय १९, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), साहिल संतोष बेंद्रे Sahil Santosh Bendre (वय १८, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक केली असून ३ अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील महेश सोसायटी चौकातील आराधना स्वीटसमोर २२ मार्च रोजी दुपारी पावणेचार वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीष कदम हा आपली आई वैशाली कदम यांना आणण्यासाठी गेला होता. तिला कामावरुन घेऊन हरीष पायी चालत असताना पावणेचार वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने त्याला अडविले. अल्पवयीन मुलाने हरीष याला विचारले की, तु माझ्या मानलेल्या बहिणीला का छेडतो, असे म्हणून तो काही बोलायच्या आत साहिल बेंद्रे व इतराने अचानक खाली पाडून काठ्यांनी मारहाण केली. अमित तळेकर व इतरांनी लाथाबुक्क्यांनी व दगडाने हरीष याच्या डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात मारहाण करुन जखमी केले. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
