Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ! गगनाला भिडलेल्या किमतींत आज किंचित दिलासा; पहा तुमच्या शहरातील ताजे भाव
पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या दरांमधील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आज मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल दिसून आला. सोन्याच्या दरांमध्ये किंचित घसरण नोंदवली गेली, तर चांदीच्या किमतींमध्येही बदल झाल्याचे दिसून आले.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७,६८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,२६,७११ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,१८,३०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,१८३ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२६,४८२
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३८,२३०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२६,४८२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३८,२३०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२६,४८२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३८,२३०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२६,४८२
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३८,२३०
