Pune Crime News | पुणे : टिंबर मार्केट येथील व्यापार्याचे अपहरण करुन दीड कोटींची खंडणी मागणाऱ्या 5 गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Crime News | टिंबर मार्केट येथील व्यापार्याचे अपहरण करुन त्यांच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागणार्या 5 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.
सौरभ विश्वनाथ पवार Saurabh Vishwanath Pawar (वय २७, रा. बावधन), शिरीष खोपडे Shirish Khopde (वय २६, रा. आंबेगाव), मंदार श्रीधर दारवटकर Mandar Shridhar Darwatkar (वय ३०, रा. वडगाव), साहिल श्रीकांत खुटवड Sahil Shrikant Khutwad (रा. भिलारेवाडी), प्रणव बबन निवगुणे Pranav Baban Nivgune (वय २३, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत २९ वर्षीय युवकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २४ मार्च रोजी पहाटे १ वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे टिंबर मार्केटमध्ये दुकान आहे. ते २३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. परंतु, रात्री ते घरी परत आले नाही. मध्यरात्री एक वाजता त्यांचा पत्नीला व्हॉटसअॅप कॉल आला. अज्ञात लोकांनी जबरदस्तीने त्यांच्या सोबत नेले असून मला डांबुन ठेवले आहे. माझ्या जीवाला धोका आहे. १ कोटी ५० लाख रुपये तयार ठेवायला सांग, मी तुला दोन तासांनी परत फोन करतो, असे बोलले. त्यानंतर फोन बंद केला. या घटनेने घाबरलेल्या फिर्यादी यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्वारगेट पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली.
गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक आरोपींचा शोध घेऊ लागली. तांत्रिक विश्लेषणात हे आरोपी व्यापाऱ्यास घेऊन नसरापूर येथे गेल्याचे समजले. त्यावरुन पोलिसांनी शोध मोहिम राबवून व्यापाऱ्याचे अपहरण करणार्या ५ जणांना पकडले.व्यापाऱ्याची ची सुटका केली. व्यवसायातील व्यवहारावरुन हे अपहरण करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
