Pune Crime News | पत्नीला नांदविण्यास पाठविण्यावरुन दोन गटात हाणामारी; मेव्हणा, दाजीने एकमेकांना मारहाण करुन केले जखमी, मंगलवाडीतील घटना

Pune Crime News | Two groups clash over sending wife to be cremated; Brother-in-law, sister-in-law beat each other up, incident in Mangalwadi

पुणे : Pune Crime News |  पत्नीला नांदण्यास पाठविण्यावरुन मेव्हणा आणि दाजी यांच्यात झालेल्या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले़ दोघांनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबत ओम गोपाळ जाधव (वय २८, रा. मुकेशनगर, वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजित बाबु शिंदे (वय ३२), लक्ष्मी बाबु शिंदे (वय ५०, दोघे रा. विनय वसंत  सोसायटी, नीलज्योती, जनवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोड वरील शेल पेट्रोल पंपाच्या पाठीमागील मंगळवाडी सोसायटीत २३ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओम जाधव याचा २०२२ मध्ये विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगी आहे. ओम जाधव याचे दुसर्‍या महिलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरुन त्याची पत्नी २१ जानेवारी २०२६ रोजी माहेरी नील ज्योती सोसायटी येथे निघून गेली. २१ मार्च रोजी ओम जाधव हा तिच्या माहेरी जाऊन माफी मागून तिला घरी येण्यास सांगितले. तिने विचार करुन सांगते असे म्हणाली. त्यानंतर २२ मार्च रोजी सायंकाळी ओम जाधव त्यांच्या घरी गेला. तेव्हा तेथे त्यांची सासु लक्ष्मी, मेव्हणा अजित, वकिल उपस्थित होते. तेव्हा ओम जाधव याने घटस्फोट घ्यायचा नसल्याचे सांगितले. त्यानंतर मध्यरात्री अजित शिंदे याने मंगलवाडी येथे बोलावून घेतले. तेथे दोघांमध्ये वादावादी झाली. तेव्हा अजित शिंदे याने तीक्ष्ण हत्याराने ओम जाधव याच्या डोक्यात सपासप वार करुन जखमी केले. ओम याने आपला मित्र चैतन्य बनपट्टे याला बोलावून घेतले. तो त्यांच्यामधील भांडण सोडवत असताना सासु लक्ष्मी हिने त्याच्या तोंडावर लाल मिरची पावडर टाकली. ससून रुग्णालयात ओम जाधव याला नेले असताना डॉक्टरांनी ५४ टाके घालून जखमांवर उपचार केले.

याविरोधात अजित बाबु शिंदे (वय ३०, रा. विनय वसंत सोसायटी, नील ज्योती, जनवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ओम गोपाळ जाधव (वय २८), चेतन बनपट्टे (वय २६, रा. मुकेशनगर, वडारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित शिंदे याने आपल्या बहिणीस नांदविण्याकरीता पाठविण्यास नकार दिला होता. अजित शिंदे हा मित्र सागर धोत्रे याच्याबरोबर २३ मार्च रोजी मध्यरात्री गप्पा मारत बसला होता. त्यावेळी ओम जाधव व त्याचा मित्र चेतन बनपट्टे हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी ओम जाधव हा बहिणीला नांदविण्यास पाठविण्याची विनवणी करुन लागला. तेव्हा अजित शिंदे याने आपण कोर्टात पाहू, असे म्हणाला. त्यावर चेतन बनपट्टे याने ओम जाधव याला आताच काय असेल ते क्लिअर करु, याला सांगून काय फायदा नाही, असे म्हणाला. त्याने ओम जाधव याला अजितला मारण्यास सांगितले. ओम जाधव याने धारदार हत्यार काढून त्याने तोंडावर वार केले. कपाळावर, हाताच्या अंगठ्याजवळ वार केल्याने जखम झाली. त्याच्याकडील चावीने डोक्यात मारले. चेतन बनपट्टे याने सिमेंट गट्टु फेकून डोक्यावर मारला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.

You may have missed