Pune PMC News | विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी माजी महापौर प्रशांत जगताप मदतीसाठी धावले
पुणे : Pune PMC News | स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाज पत्रकात विरोधी पक्षातील सदस्यांच्या प्रभागातील कामांसाठी अत्यल्प निधी मिळाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक माजी महापौर प्रशांत जगताप यांनी सभागृहात आवाज उठवला. एवढेच न्हवे तर भिमाले यांची भेट घेऊन या सदस्यांना अधिकचा निधी द्यावा, अशी विनंती केली. विशेष असे की भिमाले यांनी देखील अधिकचा निधी देण्याचे आश्वासन दिल्याने विरोधी सदस्य आश्वस्त झाले.
श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात कोंढवा येथील काँग्रेसचे चार नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण, येरवडा येथील काँग्रेस चे नगरसेवक विशाल मलके , अश्विनी लांडगे, बाणेर चे राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक अमोल बालवडकर, भवानी पेठेतील काँग्रेसचे नगरसेवक रफिक शेख, गोखलेनगर येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका अंजली ओरसे, काँग्रेस चे स्वीकृत नगरसेवक सुनील शिंदे यांना अत्यल्प निधी मिळाला आहे. यापैकी बहुतांश सदस्य पहिल्यांदाच निवडूण आले आहेत. मात्र स्थायी समितीने पहिल्याच वर्षी त्यांना अत्यल्प निधी दिला आहे. शहराचा सर्वांगीण विकास करताना भेदाभेद करू नये. याचा परिणाम थेट नागरी सेवांवर होतो. याचा विचार करावा असे आवाहन प्रशांत जगताप यांनी भाषणात केले.
एवढेच न्हवे तर प्रशांत जगताप यांनी भाषणानंतर या सदस्यांसह भिमाले यांची भेट घेत या सदस्यांना तरतूद उपलब्ध करून देण्याची विनंती केली. भिमाले यांनी देखील या सदस्यांना अधिकचा निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
