Gold-Silver Price Today | आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात सोन्याची उसळी; चांदीही महागली, आजचे दर काय?
पुणे : Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडत आहेत. सोन्याच्या दरांमधील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आज बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये एक मोठा बदल दिसून आला. सोन्याचे दर वाढले असले, तरी चांदीच्या किमतीतही बदल नोंदवले गेले आहेत.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १, ५१,४१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३८,७९३ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,३९,७९० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३९८ रुपये आहे.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३८,६६४
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५१,२७०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३८,६६४
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,२७०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३८,६६४
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,२७०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३८,६६४
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५१,२७०