Pune PMC News | समाविष्ट 23 गावांतील बांधकाम परवानग्यांवर पीएमआडीएने पुढील 60 दिवसांत कार्यवाही करावी; शासनाचे पीएमआरडीएला आदेश

Pune PMC News

पुणे : Pune PMC News | शासनाने पुणे महापालिकेमधील समाविष्ट २३ गावांच्या बांधकाम परवानगीचे अधिकार यावर्षी ११ फेब्रुवारीला पीएमआरडीए कडून महापालिकेकडे सोपविण्यात आले आहेत. परंतू तत्पुर्वी या गावांमधून समाविष्ट गावांतून मागण्यात आलेल्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्‍न  निर्माण झाल्याने  शासनाने पीएमआरडीएला पुढील ६० दिवसांत या परवानग्यांवर कार्यवाही करावी, असे आदेश पीएमआरडीएला दिले आहेत.

पीएमआरडीएच्या हद्दीतील २३ गावांचा २०२१ मध्ये  महापालिकेत समावेश करण्यात आला. परंतू या गावांच्या विकास आराखड्याचे तसेच  या गावांतील बांधकाम परवानग्यांचे अधिकार पीएमआरडीएकडेच ठेवण्यात आले होते. दरम्यान  पीएमआरडीएचा आराखडा रद्द झाल्यानंतर शासनाने मागीलवर्षी सप्टेंबरमध्ये या गावांतील विकास परवानग्यांचे अधिकार पालिकेकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. परंतू त्याचा प्रत्यक्षात शासन आदेश यावर्षी ११ फेब्रुवारीला काढण्यात आला.  यामुळे पीएमआडीएकडे प्रलंबित असलेल्या बांधकाम परवानग्यांचा विषय चर्चेत आला.

शासनाने याची दखल घेत पीएमआरडीएकडे दाखल झालेल्या २३ गावांतील बांधकाम परवानग्यांचे प्रस्ताव शासनाच्या आदेशानंतर पुढील ६० दिवसात मार्गी लावावेत.  जे प्रस्ताव मान्य होतील त्यांचे बांधकाम शुल्क जमा करून ते महापालिकेला द्यावे, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे.

You may have missed