Pune Crime News | दीड वर्षापूर्वी 17 वर्षाच्या मुलाच्या खुनाच्या कारणावरुन 17 वर्षाच्या मुलावर गोळीबार करुन केला खुनाचा प्रयत्न, सिंहगड रोड पोलिसांनी 5 अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | श्रीपाद अनंता बनकर या १७ वर्षाच्या मुलावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन करण्याची घटना ३ डिसेंबर २०२४ मध्ये घडली होती. या घटनेत सिंहगड रोड पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. या घटनेवरुन पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन अल्पवयीन मुलांनी गोळीबार करुन एका १७ वर्षाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याच्या घटना वडगाव येथील चरवडवस्तीत घडली. सिहंगड रोड पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. यामुळे अल्पवयीन मुलांकडून होणार्‍या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सुरज संतोष गायकवाड (वय १७, रा. जाधवनगर, वडगाव) असे गोळी लागल्याने जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याच्या उजव्या मांडी मध्ये गोळी घुसली होती. ही घटना वडगाव येथील चरवडवस्ती येथील मोकळ्या मैदानात ७ एप्रिल रोजी पावणेबारा वाजता घडली होती. यातील फिर्यादी आणि आरोपी हे वडगाव बुद्रुक परिसरात राहणारे आहेत. आरोपी मुले दहावी, अकरावीमध्ये शिकत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येता जाता आमच्याकडे का पाहतो, या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून श्रीपाद अनंत बनकर (वय १७) या मुलावर वडगाव  बुद्रुक येथे कोयत्याने वार करुन निर्घुण खुन करण्यात आला होता. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला होता. बनकर खुनाचे कारण तसेच येता जाताना आमच्याकडे का पाहतो, या वरुन आताच त्यांच्यात भांडणे झाली होती. सुरज गायकवाड व साहिल खान हे दुचाकीवरुन जात असताना आरोपींनी त्यांना थांबा, तुमचा विषयच संपवतो, असे म्हणून शिवीगाळ करुन लोखंडी हत्याराने मारहाण केली.

त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्टलमधून सुरज गायकवाड याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केले. ही गोळी सुरज याच्या डाव्या मांडीत घुसून तो गंभीर जखमी झाला. तसेच साहिल खान याच्या दिशेनेही गोळी झाडली. सुदैवाने खान याला ही गोळी लागली नाही. सुरज गायकवाड याला तातडीने रुग्णालयात नेऊन त्या मांडीतून गोळी काढण्यात आली. त्याच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

You may have missed