Pune Police News | प्राचार्यांना पोक्सोच्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून खंडणीखोरी करणारे पीएसआय अजित बडे, रीलस्टार सोनाली हिंगे, सुदाम तायडे निलंबित
पुणे : Pune Police News | अल्पवयीन विद्यार्थीनीला हाताशी धरुन प्राचार्यांना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन बदनामी करण्याची भिती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळणार्या पोलीस उपनिरीक्षक, रीलस्टार पोलीस अंमलदारांसह तिघांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे Ajit Trimbak Bade (वय ३५, रा. त्रिमुर्ती अपार्टमेंट, लक्ष्मीनगर, पर्वती), पोलीस अंमलदार सुदाम बाळकृष्ण तायडे Sudam Balakrishna Tayde (वय ३५, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, हिंजवडी) आणि रीलस्टार सोनाली गुलाबराव हिंगे Sonali Gulabrao Hinde (वय ३५, रा. जे जेनगर, केसनंद फाटा, वाघोली) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. (PSI Ajit Bade)
मंगळवार पेठेतील एका महाविद्यालयात १८ ते २८ जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडला होता. या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीला हाताशी धरुन या पोलिसांनी तिला फिर्यादी प्राचार्य यांच्या विरोधात भिती दाखवुन, फसवणुक करुन खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. प्राचार्य यांना पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होईल, अटक केली जाईल. तुमची व महाविद्यालयाची बदनामी होईल, अशी भिती दाखविली. त्यांच्याकडून ७ लाख रुपयांची खंडणी उकळली होती. या मुलीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सर्व खरा प्रकार सांगितला. त्यानंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच ते फरार झाले आहेत. (Sonali Hinge Police)
आपल्या कर्तव्यात बेजबाबदार, निष्काळजीपणाने गैरवर्तन केल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी तिघांना निलंबित केले आहे.
