Pune Crime News | धनकवडीत दहशत माजविणार्‍या सराईत गुंडावर एमपीडीए अन्वये कारवाई; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक वर्षासाठी यवतमाळ कारागृहात केले स्थानबद्ध

Pune Crime News | Action under MPDA against goon who created terror in Dhankawadi; Police Commissioner Amitesh Kumar sent him to Yavatmal jail for one year

पुणे : Pune Crime News |  धनकवडी परिसरात दहशत माजविणार्‍या गुंडाविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.

रोहन राजेंद्र रोेंगे Rohan Rajendra Ronge (वय २१, रा. गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.

रोहन रोंगे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याच्या मार्फत सादर केला. या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंजूरी दिली. त्यानुसार रोंगे याला एक वर्षासाठी यवतमाळ कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दाम हुसेन फकीर, बापू खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, विनायक एडके, गोरख ढगे, योगेश ढोले, सागर सूतकर यांनी केली.

You may have missed