Pune Crime News | अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पत्नीचा छळ करणार्या पतीसह ज्योतिषी, अॅस्ट्रॉलॉजर महिलांवर जादुटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन ज्योतिषी, अॅस्ट्रॉलॉजर/ वास्तू कंन्सल्टंटच्या मदतीने पत्नीचा छळ केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ३३ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती विवेक गणपत निकम Vivek Ganpat Nikam (वय ३७, रा. सिद्धार्थ सोसायटी, दत्तनगर रोड, कात्रज), शितल ऊर्फ स्त्रीतल सालके (वय ४२, रा. रुणवाल पॅराडाईज, पौड रोड, कोथरुड) आणि पोर्णिमा सारस्वत (वय ४२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२४ ते १० एप्रिल २०२६ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक निकम हे व्यावसायिक असून त्यांचे नर्हे येथे कार्यालय आहे. शितल सालके व पोर्णिमा सारस्वत या ज्योतिष, वास्तू कंन्सल्टंट/ अॅस्टॉलॉजर म्हणून काम करतात. निकम यांनी या दोन महिलांशी संगनमत करुन त्यांचे ऐकून अंधश्रद्धा पसरवत आहे. सतत फिर्यादी यांच्याशी भांडण करुन व माहेरहून ५ लाख रुपये आणण्यासाठी त्यांचा छळ करत आहे. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करतो. घर सोडून जाण्याबाबत बोलून व घटस्फोट घेण्याबाबत धमकावुन फिर्यादी यांना क्रुर वागणुक देत आहेत.
हे तिघे जण संगनमत करुन फिर्यादी व त्यांचे कुटुंबाला वेगवेगळ्या बाबी सांगून, मरणाची व इतर भिती घालतात. मंत्रोपचाराने आजार बरा करण्याचा दावा करुन अनिष्ट व अघोरी प्रथा चा अवलंब करत आहे. त्याच प्रमाणे जादुटोणा सारखे प्रकारच्या कृती स्वत: करत असून त्याप्रमाणे सर्व इतरांना देखील करण्यास प्रवृत्त करत आहेत. फिर्यादी यांना ते मान्य नाही़ म्हणून त्यांना त्रास दिला जातो. शितल सालके हिने फिर्यादी यांच्या राहते घरी येऊन फिर्यादी यांना तिच्या प्रोफेशनबद्दल व फी बद्दल बाहेर कोणाला काही सांगितल्यास बघुन घेईल, अशी धमकी दिली आहे.
वास्तू कंन्सल्टंट असल्याचा दावा करणार्या पोर्णिमा सारस्वत हिने तुमची भरभराट व्हावा यासाठी विवेक निकम याला त्याच्या घराच्या रचनेमध्ये आणि कार्यालयाच्या रचनेमध्ये बदल करायला सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करीत आहेत.
