Prashant Jagtap | स्थायी समितीत जलतरण तलावाचा मुद्दा गाजला; रास्ता पेठेतील शाहू महाराज तलावावरून वाद, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप आक्रमक

Pune PMC News | Suspicion of fraud in waste project? Prashant Jagtap warns of moving to High Court

पुणे : Prashant Jagtap | महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलावाचा मुद्दा चांगलाच तापला. या तलावाचे व्यवस्थापन अनेक वर्षांपासून एका खाजगी कंत्राटदाराकडे असून, कंत्राटाची मुदत २०२४ मध्ये संपल्यानंतरही त्याच्याकडेच व्यवस्थापन कसे राहिले, असा प्रश्न सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपस्थित केला.

या विषयावर आयुक्तांनी प्रतिक्रिया देताना नियमभंग झाल्याचे संकेत देत जलतरण तलाव तातडीने सील करण्याची भूमिका मांडली. मात्र, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर आक्षेप घेत स्थानिक नागरिकांच्या हिताचा मुद्दा उपस्थित केला.

जगताप यांनी सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्टीत परिसरातील अनेक मुले या तलावात पोहण्यासाठी येतात. प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांना फटका बसू नये. त्यामुळे तलावाचे व्यवस्थापन खाजगी कंत्राटदाराकडून काढून घेऊन महापालिकेने स्वतःकडे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

या सूचनेवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. त्यामुळे तलावाच्या व्यवस्थापनाबाबत पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You may have missed