Pune PMC News | पुणे : महापालिकेतील ‘सल्लागार राज’वर आक्षेप; नेमणुकांवर लगाम घालण्याची मागणी

Pune PMC News | Pune: Objections to 'Consultant Raj' in Municipal Corporation; Demand to rein in appointments

पुणे : Pune PMC News | महानगरपालिकेत वाढत्या ‘सल्लागार राज’विरोधात माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्र पाठवून सल्लागार नेमणुकांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.

महापालिकेत सक्षम अधिकारी आणि अनुभवी अभियंते उपलब्ध असतानाही प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमण्याची पद्धत ही प्रशासनातील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘प्रत्येक कामासाठी सल्लागारच हवा’ ही भूमिका चिंताजनक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.

महापालिकेत विविध प्रकल्प आणि धोरणांसाठी मोठ्या प्रमाणात बाह्य सल्लागारांची नियुक्ती होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, जेव्हा संस्थेमध्येच तज्ज्ञ अधिकारी आणि अभियंते आहेत, तेव्हा बाहेरील सल्लागारांवर अवलंबून राहण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसेच सल्लागार संस्थांकडे प्रत्यक्ष ‘पे-रोल’वरील तज्ज्ञ कर्मचारी आहेत का, याची चौकशी करूनच कामे देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रशासनात ‘खो-खो’ सुरू असल्याची टीका करत, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

You may have missed