Surendra Pathare Foundation | सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या ‘वय वंदना कार्ड’ शिबिराला ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Surendra Pathare Foundation | Seniors' enthusiastic response to Surendra Pathare Foundation's 'Vay Vandana Card' camp

पुणे: Surendra Pathare Foundation | सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वय वंदना कार्ड शिबिर’ दिनांक २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी खराडी व विश्रांतवाडी येथे उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले.

शिबीरामध्ये एकूण ४८६ ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून वय वंदना कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली तसेच योजनेविषयी सविस्तर माहिती घेतली. शिबिरामध्ये आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, नोंदणी प्रक्रिया आणि मार्गदर्शन यांची सुलभ व सुरळीत व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचे आरोग्यकवच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच कॅशलेस आणि पेपरलेस सुविधेमुळे उपचार घेणे अधिक सुलभ होणार आहे.

यावेळी नगरसेविका ऐश्वर्या पठारे यांनी सांगितले की, “समाजातील ज्येष्ठ नागरिक हे आपले आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशा शिबिरांमुळे त्यांना थेट लाभ मिळतो.” यासाठी असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे.”

“‘वय वंदना कार्ड’ शिबिर हा ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरला. एकाच ठिकाणी सेवा मिळाल्यामुळे अनेकांना थेट लाभ झाला. या यशस्वी उपक्रमासाठी फाऊंडेशनच्या टीमचे आभार.”

–  दिलीप पवार, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ

शिबिरात सहभागी झालेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.  या शिबिरास ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी किशोर जगदाळे, बाबुराव खरोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते. वय वंदना कार्ड शिबीर वडगावशेरी, विमाननगर, वाघोली तसेच इतर ठिकाणीही येत्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.

You may have missed