Patrakar Mahasangha Sthapna Din | महाराष्ट्र दिनी पत्रकार महासंघाचा स्थापना दिन; ‘महाराष्ट्रधर्म आणि पत्रकारिता’वर परिसंवाद

Patrakar Mahasangha Sthapna Din | Maharashtra Day marks the foundation day of the Journalists' Federation; Seminar on 'Maharashtra Religion and Journalism'

पिंपरी : Patrakar Mahasangha Sthapna Din | संयुक्त महाराष्ट्र पत्रकार महासंघ, मुंबई यांच्या वतीने स्थापना दिनानिमित्त ‘महाराष्ट्रधर्म आणि पत्रकारिता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. ०१ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भोसरी एमआयडीसी येथील ‘द फर्न रेसिडेन्सी’ येथे होणार आहे.

कार्यक्रमास महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे प्रमुख उपस्थित राहणार असून, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे अध्यक्षस्थानी असतील. परिसंवादाचे उद्घाटन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे तसेच विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर उपस्थित राहणार आहेत.

मुख्य अतिथी म्हणून महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, बीव्हीजीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणवीस, लोकसत्ताचे संपादक सिद्धार्थ केळकर, न्यूज १८ चे इनपुट हेड अमित मोडक तसेच पोलीसनामाचे संपादक नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत.

परिसंवादात न्यूज १८ मराठीचे संपादक मंदार फणसे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक महेश म्हात्रे, मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अभ्यासक (बेळगाव) तसेच ज्येष्ठ विचारवंत संजय सोनवणी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष गोविंद घोळवे, प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे आणि सरचिटणीस नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You may have missed