DG Medal News | मोटार परिवहन विभागातील 8 पोलीस अधिकार्‍यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्हाने गौरव

DG Medal News | 8 police officers of Motor Transport Department honored with DG Medal

पुणे : DG Medal News | महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीतील प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील औंध आणि बाणेर येथील ८ पोलीस अधिकार्‍यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश लहानुजी आस्कर
पोलीस निरीक्षक अबरार नियामतुल्ला सय्यद
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चंद्रकांत पवार
सहायक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिगंबर वाघचोडे
सहायक पोलीस उपनिरीक्षक समाधान भारत बिचितकर
सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पंढरीनाथ भेगडे
सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश आनंदराव बागुल
पोलीस हवालदार प्रितम शिवशंकर राऊत
मोटार परिवहन विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. मोटार परिवहन विभागातील उत्कृष्ट आणि उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना हा बहुमान देण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी उदय शिंगाडे यांनी सांगितले.

You may have missed