Pune ACB Trap | आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यासाठी 40 हजारांची लाच घेणारा एजंट गजाआड

Pune ACB Trap | Agent arrested who took bribe of Rs 40 thousand to provide admission under RTE

पुणे : Pune ACB Trap | शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर टी ई) मुलीचा प्रवेश करुन पडताळणी फॉर्मची पावती देण्यासाठी ४० हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका एजंटला अटक केली आहे.

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली गंगाराम जगताप Dnyaneshwar alias Mauli Gangaram Jagtap (वय ३७, रा. नंदनवन कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत एका मुलीच्या वडिलांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे मुलीला आर टी ई अंतर्गत अ‍ॅडमिशन घेण्याकरीता त्यांनी १६ मार्च २०२६ रोजी ऑनलाईन अर्ज भरला होता. या अर्जाची पडताळणी करण्यासाठी ते २७ एप्रिल २०२६ रोजी आकुर्डी येथील फकीर भाई पानसरे पिंपरी चिंचवड महानगर पालिका उर्दू प्राथमिक शाळा येथे गेले होते. तेथे त्यांना अर्ज रिजेक्ट झाल्याबाबत सांगण्यात आले. तेथे त्यांची भेट माऊली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदार यांच्या मुलीचे अ‍ॅडमिशन करुन पडताळणी अर्जाची पावती देण्यासाठी ४० हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली. त्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला २९ एप्रिल रोजी मिळाली. त्याची पडताळणी ३० एप्रिल रोजी करण्यात आली. त्यात माऊली जगताप याने मुलीचे अ‍ॅडमिशन करण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फकीरभाई पानसरे उर्दू शाळेत सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून ४० हजार रुपये घेताना माऊली जगताप याला पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे व त्यांचे सहकारी यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करीत आहेत.

You may have missed