Pune Crime News | आय टी कंपनीत ड्रायव्हर असताना मॅनेजर असल्याचे सांगून फसवणुक करुन लग्न करुन विवाहितेचा छळ करणार्या पाच जणांवर आंबेगाव पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | आय टी कंपनीत ड्रायव्हर असताना मॅनेजर असल्याचे खोटे सांगून फसवणूक करुन लग्न केले. त्यानंतर तिचा शारीरिक व मानसिक छळ करणार्या पाच जणांविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दीपक दौलतराव मुरकुटे Deepak Daulatrao Murkute (रा. खांदवेनगर, खराडी), रेखा दौलतराव मुरकुटे Rekha Daulatrao Murkute (रा. देवकर, ता. लातूर), राहुल दौलतराव मुरकुटे Rahul Daulatrao Murkute (रा. कर्वेनगर), कल्पना पिंटू मुंढे Kalpana Pinto Mundhe (रा. अरबुजवाडी, परभणी) आणि अमृता आनंद शेटे Amrita Anand Shete (रा. संघषे चौक, चंदननगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. हा प्रकार खराडीतील खंदावेनगर येथे २५ मे २०२५ पासून आजपर्यंत घडला. याबाबत २६ वर्षाच्या महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक मुरकुटे याचे लग्नाच्या आधीपासून एका महिलेशी प्रेमसंबंध आहेत. दीपक मुरकुटे हा आय टी कंपनीमध्ये ड्रायव्हर असताना मॅनेजर आहे, असे सांगून फसवणुक करुन त्यांचे लग्न लावले. लग्नानंतर आरोपींनी फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ करुन क्रुर वागणूक दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. तिच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करीत आहेत.
