Pune Crime News | सराईत गुन्हेगाराकडून गुन्हे शाखेच्या युनिट 6 च्या पथकाने गावठी पिस्टलसह 2 जिवंत काडतुसे केली जप्त
पुणे : Pune Crime News | फुरसुंगी येथील गंगानगर भागात फिरणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
साहिल शाम नरळकर Sahil Sham Naralkar (वय २५, रा. चक्रपाणी वसाहत, मंगलमुर्ती हौसिंग सोसायटी, भोसरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक ५ मे रोजी पूर्व भागात समांतर रात्रगस्त पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शेखर काटे व तानाजी देशमुख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साहिल नरळकर हा फुरसुंगीतील गंगानगर भागात फिरत असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे. या खात्रीशीर माहितीवरुन पोलिसांनी शोध घेऊन साहिल नरळकर याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आली. फुरसुंगी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, पल्लवी मोरे, गणेश माने, शेखर काटे व उमेश शेलार यांनी केली आहे.
