Pimpri Crime News | व्यापार्यावर गोळीबाराच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलीस अॅक्शन मोडवर ! 4 सराईत गुन्हेगारांकडून 9 देशी कट्टे, तब्बल 46 जिवंत काडतुसे केली जप्त
पिंपरी/ पुणे : Pimpri Crime News | देहुरोड परिसरात व्यापार्यावर गोळीबार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याची घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ४ सराईत गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून ९ देशी कट्टे, ५ अतिरिक्त मॅक्झिन व तब्बल ४६ जिवंत काडतुसे असा ८ लाख रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
अझरुद्दीन रफिक सुतार Azharuddin Rafiq Sutar (वय ३०, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव), वैभव अशोक शेटे Vaibhav Ashok Shete (वय ३१, रा. महाराष्ट्र कॉलनी, थेरगाव), सौरभ धनंजय जाधव Saurabh Dhananjay Jadhav (वय २७, रा. पाषाण), अक्षय अशोक कांबळे Akshay Ashok Kamble (वय ३१, रा. पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
देहुरोड येथील बाजारात व्यापार्यावर गोळीबार करुन त्याचा निर्घुण खुन करण्यात आला होता. अवैध शस्त्र बाळगणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते. गुन्हेगारांवर कारवाई करत असताना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना अवैध शस्त्रांसंबंधी माहिती मिळाली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल झाल्याचे दिसून आले. त्यावर ठोस कारवाई करण्यासाठी हा गुन्हा गुन्हे शाखेच्या युनिट १ कडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चौघांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीतील तपासादरम्यान त्यांच्याकडून ९ देशी कट्टे, ५ मॅक्झिन व ४६ जिवंत काडतुसे, २ वाहने असा ८ लाख रुपयांचा माल व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
अझरुद्दीन सुतार हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो तर, वैभव शेटे हा सोशल मीडियावर मॅनेजमेंट करत असतो. सौरभ जाधव हा इस्टेट एजंट असून अक्षय कांबळे हा मजुरी करतो. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, पोलीस हवालदार जयवंत राऊत, महादेव जावळे, अजय डगळे, देवा राऊत, शिवराम भोपे, विजय शेळकंदे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, पोलीस हवालदार उषा दळे, पोलीस अंमलदार संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहेल चिखलकर, उद्धव खेडकर, दीपक तांदळे यांनी केले आहे.
