LPG Gas | एलपीजी सिलिंडरचे नियम बदलले; आता गॅस हवा असेल, तर ‘हे’ नवीन नियम पाळावेच लागणार

LPG Gas | LPG cylinder rules changed; Now if you want gas, you will have to follow 'these' new rules

नवी दिल्ली :   LPG Gas | घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या करोडो ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठी नियमावली जाहीर केली असून, १ मे २०२६ पासून तिची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. गॅसचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ अनिवार्य केला आहे. आता केवळ पैसे देऊन सिलिंडर घेता येणार नाही, तर डिलिव्हरी बॉय तुमच्या दाराशी आल्यावर त्याला नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी देणे बंधनकारक असेल. हा कोड जुळल्याशिवाय तुमची गॅस डिलिव्हरी पूर्ण मानली जाणार नाही.

या नवीन नियमावलीतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ‘एक घर, एक कनेक्शन’ हे धोरण. ज्या घरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजेच पाईपलाईनद्वारे गॅस पुरवला जातो, अशा ग्राहकांना आता घरगुती एलपीजी सिलिंडर वापरता येणार नाही. ज्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना एलपीजी कनेक्शन त्वरित सरेंडर करावे लागणार आहे. तेल कंपन्यांनी अशा दुहेरी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना नवीन सिलिंडर न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर ग्राहकाने ही माहिती लपवली, तर त्यांचे कनेक्शन कायमचे कापले जाऊ शकते.

काळाबाजार रोखण्यावर सरकारचा भर

अनुदानित एलपीजी सिलिंडरचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे धोरण लागू केले आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये अजून पीएनजी पाइपलाइन पोहोचलेली नाही, त्या गरजू कुटुंबांना एलपीजीचा पुरेसा पुरवठा मिळावा, हा सरकारचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

You may have missed