Protest In Kothrud For Tree | नैसर्गिक प्रवाहावर शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोडचा घाट, कोथरूड येथील रोहित मारणे यांचे अर्धनग्न आंदोलन !

Protest In Kothrud For Tree | Half-naked protest by Rohit Marne from Kothrud, killing hundreds of trees on the natural stream and destroying the ghat of DP Road!

पुणे : Protest In Kothrud For Tree |  कोथरूड भागातील कर्वे रस्त्यावर असलेल्या नैसर्गिक ओढ्यावर पर्यावरणाचा ऱ्हास करून झाडे कापुन बिल्डर मित्रांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी डिपी रोडचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप करत, डि पी रोड साठी ज्या ठिकाणाची झाडे कापली जाणार आहेत त्याच ठिकाणी परत झाडे लाऊन कोथरूड भागातील शिवसेनेचे पदाधिकारी रोहित मारणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन केले.

“नैसर्गिक प्रवाह बुजवून व शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोडचा घाट या ठिकाणी घालण्यात आला आहे. एकीकडे पुणे शहराच वातावरण दिवसेंदिवस वाढत असताना विकासाच्या नावाखाली ठराविक बांधकाम व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देण्याच्या उद्दिष्टाने या नैसर्गिक प्रवाहावर सुमारे शेकडो झाडांची कत्तल करून डिपी रोड बांधण्यात येणार आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास पाण्याचा निचरा होऊ शकणार नाही व परिणामी कोथरूड भागात पावसाचे पाणी साचेल, ज्याचे प्रमाण आपण काही दिवसांपूर्वीच पडलेल्या अवकाळी पावसानंतर बघितले आहे. आम्ही सातत्याने या संदर्भात आंदोलनं व महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनाने या संदर्भात कुठलीही कारवाई न केल्याने आम्ही लवकरच न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहोत व पर्यावरणाच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने घातक असणारे हे काम बंद पाडण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करणार आहोत..” असे विधान रोहित मारणे यांनी यावेळी केली.

या प्रसंगी रोहित मारणे यांच्यासह कोथरूड भागातील सर्वपक्षीय पदाधिकारी उदय भेलके, बाळासाहेब विचारे, सागर पोरे, किरण आडागळे, अजय घोलप,  प्रवीण शर्मा, रौनक विचारे व इतर मंडळी उपस्थित होती.

You may have missed