Pune Crime News | विकलेल्या दागिन्यांवरुन 80 वर्षाच्या वृद्धेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस ! भावकीतील तरुणाने दागिने चोरताना गळा दाबुन खुन करुन मृतदेह टाकला भीमा नदीच्या पात्रात

Pune Crime News | Murder of 80-year-old woman revealed over sold jewellery! A young man from Bhavki strangled her to death while stealing jewellery and dumped her body in the Bhima river

पिंपरी/ पुणे : Pune Crime News |  एकट्या राहणार्‍या ८० वर्षाच्या वृद्धेच्या गळ्यातील दागिने चोरुन नेताना तिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर तिचा मृतदेह गोणीमध्ये भरुन भीमा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भावकीतील तरुण काही काम धंदा करता नसताना सोन्याचे दागिने विकुन आलेल्या पैशातून तो दारु पित असल्याचे समजले. विकलेले दागिन्याचे फोटो पाहून बेपत्ता असलेल्या ८० वर्षाच्या आजीचे हे दागिने असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन खुनाचा गुन्हा उघडकीस आला. उत्तर महाळुंगे पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे.

कैलास कुंडलिक मरगज Kailash Kundlik Margaj (वय ३६, रा. करंजविहिरे, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सिंधुबाई विठोबा मरगज (वय ८०, रा. करंजविहीरे) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत समीर बाळु मरगज (वय २७, रा. करंजविहीरे, ता. खेड) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २ मे रोजी रात्री ८ वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुबाई मरगज या एकट्याच रहात होत्या. २ मे रोजी सांयकांळी साडेसहा वाजता त्या मुक्ताई मंदिरात दिवा लावून कोठेतरी निघुन गेल्या होत्या. त्या मुलीकडे गेल्या असाव्यात असे फिर्यादींना वाटले. पण त्यांच्याकडेही त्या गेल्या नसल्याने त्यांचा शोध सुरु केला. परंतु, त्या कोठे मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी ५ मे रोजी आजी सिंधुबाई मरगज या बेपत्ता असल्याची तक्रार पाईट पोलीस चौकी येथे दिली. आजीचा शोध घेत असताना त्यांचा चुलत भाऊ अजिंक्य  मरगज यांना समजले की भावकीतील कैलास कुंडलिक मरगज याच्याकडे गेल्या चार दिवसांपासून जादा पैसे आले असून तो सतत दारू पित असल्याची माहिती मिळाली. काही काम धंदा न करता इतके पैसे आले कोठून याची त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्याचा जोडीदार व संपत ऊर्फ रावण राहुल तुळवे याने सांगितले की, त्याने सोन्याचे दागिने विकले असून त्यातून त्याला पैसे आले आहेत.

त्याने दागिने विकलेल्या गुरुकृपा ज्वेलर्सकडे ते गेले. त्याने दागिने मोडीने विक्री करुन २५ हजार रुपये दिल्याचे सांगितले. सराफाकडे कैलास याने विकलेले दागिन्याचे फोटो घेतले. ते सिंधुबाई मरगज यांची जाऊ फुलाबाई हिस दाखविले. तिने दागिन्याचे फोटो पाहून हे सिंधुबाई मरगज हिचेच दागिने असल्याचे सांगितले. त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यावरुन पोलिसांनी कैलास मरगज याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल केला. आजी सिंधुबाई एकट्या चालल्या असताना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेत असताना तिचा गळा दाबुन खुन केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत प्लास्टिक गोणीत  भरले. ती गोणी करंजविहिरे ते धामणे या रोडवरील पुलावरुन भीमा नदीत टाकून दिल्याचे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी शोध घेतल्यावर नदीच्या काठावर एका गोणीमध्ये सिंधुबाई मरगज यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक तपास करीत आहेत.

You may have missed