Pune Crime News | अनैतिक संबंधातून तरुणाचा खुन; आंबेगाव पठार येथील इंद्रायणीनगरमधील घटना

Pune Crime News | Murder of a young man due to immoral relationship; Incident in Indrayani Nagar, Ambegaon Plateau

पुणे : Pune Crime News |  अनैतिक संबंधाच्या संशयावरुन दोघा जणांनी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खुन केला. ही घटना आंबेगाव येथील इंद्रायणीनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

दीपक क्षीरसागर (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, आंबेगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हा पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कामाला होता. त्याचा विवाह झालेला नव्हता़. इंद्रायणीनगरमधील घराजवळ दीपक असताना दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खुन केला. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अनैतिक संबंधातून हा खुन करण्यात आल्याचा संशय असल्याचे पोलिसांचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस दोघा हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

You may have missed