Pune Crime News | रेर्कार्डवरील तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने केले जेरबंद, जुगारीचे एक डझन गुन्हे

Pune Crime News | A fugitive criminal on record was arrested by the Crime Branch Unit 2 team, a dozen gambling crimes were registered.

पुणे : Pune Crime News | जुगार घेत असल्याचे तब्बल एक डझन गुन्हे दाखल असल्याने तडीपार केले असतानाही पुणे शहरात आलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे.

शाबीर महंमद शेख ऊर्फ शाहू Shabir Mohammed Sheikh alias Shahu (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी) असे या गुंडाचे नाव आहे.

युनिट २ चे पथक हे ८ मे रोजी स्वारगेट परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस हवालदार संदीप शिर्के, ऋषिकेश व्यवहारे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुंड हा डायस प्लॉट येथील अथर कंपनीसमोरील फुटपाथवर थांबला आहे. या माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचून शाबीर शेख याला ताब्यात घेतले. त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्याच्या जुगार कायद्या अंतर्गत एकूण १२ गुन्हे दाखल असून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी त्याला २ वर्षासाठी तडीपार केले आहे. असे असताना तो शहरात मिळून आल्याने पुढील तपासासाठी त्याला स्वारगेट पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस हवालदार संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, ऋषीकेश व्यवहारे, सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केली आहे.

You may have missed