Gold-Silver Price Today | पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्याच्या दरात घसरण; पाहा आजचे 10 ग्रॅम सोन्याचे ताजे दर
मुंबई : Gold-Silver Price Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, आज ११ मे २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. काल हैदराबाद येथील सभेत पंतप्रधानांनी परकीय चलन वाचवण्यासाठी किमान वर्षभर तरी सोन्याची खरेदी पुढे ढकलावी असे भावनिक आवाहन केले होते, ज्याचा थेट परिणाम आज बाजार उघडताच ग्राहकांच्या मानसिकतेवर आणि सोन्याच्या किमतींवर झाला आहे.
आज बाजार सुरू होताच २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे साधारण ३०० ते ६०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५२,३५० रुपयांच्या आसपास असून, पुण्यात हा दर १,५२,६८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. नाशिकमध्ये सर्वात जास्त म्हणजे सुमारे ४०० रुपयांची घसरण पाहायला मिळाली असून तिथे भाव १,५१,१५९ रुपयांवर स्थिरावला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या बाबतीतही अशीच स्थिती असून, बहुतेक प्रमुख शहरांमध्ये दर १,४०,००० रुपयांच्या खाली घसरले आहेत.
सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही काही अंशी नरमाई दिसून येत आहे. सध्या देशात चांदीचा सरासरी दर २,७४,९०० रुपये प्रति किलो इतका आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते, मे महिन्यातील लग्नाचे महत्त्वाचे मुहूर्त आता संपत आले आहेत आणि त्यातच पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे गुंतवणूकदार आता सोने खरेदी करण्याऐवजी ‘वाट पाहा’ या भूमिकेत आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत मागणीत आणखी घट होऊन दरामध्ये अजून मोठी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजचा सोन्याचा भाव –
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३९,६५०
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५२,३५०
दिल्ली :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३९,८००
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५३,२००
कोलकाता :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३९,६५०
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५२,३५०
चेन्नई :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४१,५००
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,५४,३७०
