Pune Crime News | पुणे : ‘तु भेटला म्हणून वाचला, तुझा बाप भेटला असता तर त्याचं मुंडक तोडून नेलं असत’; बहिण-भावामध्ये घर बांधण्यावरून झालेल्या वादात परस्पराला मारहाण करुन केले जखमी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | डायस प्लॉट येथील जागेत घर बांधण्यावरुन दुधाणे कुटुंबातील बहिण भावामध्ये झालेल्या वादात दोन्ही कुटुंबांनी परस्पराला मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.

याबाबत अरमानसिंग शक्तीसिंग दुधाणे (वय १७, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पिंटुसिंग रणवीरसिंग दुधाणे Pintusing Ranveersingh Dudhane (वय ४०), आसमानसिंग बालासिंग टाक Asmansingh Balasingh Tak (वय ३६), खलीसिंग पिंटूसिंग दुधाणे Khaleesing Pintusing Dudhane (वय २०, सर्व रा. गुलटेकडी मार्केटयार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डायस प्लॉट येथे १० मे रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शक्तीसिंग दुधाणे आणि धनकौर रणवीरसिंग दुधाने हे भाऊ बहिण आहेत. शक्तीसिंग दुधाणे याने डायस प्लॉट येथे घर बांधण्यास काढले आहे. त्याला घर बांधण्यास धनकौर हिचा विरोध आहे. यावरुन त्यांच्यामध्ये वादावादी सुरु होती. अरमानसिंग दुधाणे या मुलाला ताप आल्याने तो घरात गोळी घेऊन झोपला होता. त्यावेळी पिंटुसिंग दुधाणे व इतर त्यांच्या घरात शिरले. आसमानसिंग टाक याने कशाच्या तरी सहाय्याने झोपलेले मुलावर वार करण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्या डोळ्याच्या वर लागला. पिंटुसिंग याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुलगा मागे सरकल्याने घरातील कपाटाच्या आरशाला जोरात लागला. तिघांनी या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंटुसिंग म्हणाला, ‘‘तू भेटला म्हणून वाचला, तुझा बाप भेटला असता, तर त्याचं मुंडक तोडून नेले असत. आताच मी कोथरुडला एकाचा हात कापला तसेच तुझ्या बापाचा मुंडक कापलं असतं आणि सांग तुझ्या बापाला जिथे भेटेल, तिथे त्याच्या *** गोळ्या घालीन’’ अशी धमकी देऊन ते निघून गेले.

याविरोधात धनकौर रणवीरसिंग दुधाणे (वय ६०, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी शक्तीसिंग दीपकसिंग दुधाणे (Shaktisingh Deepaksingh Dudhane), भक्तीसिंग दीपकसिंग दुधाणे (Bhaktisingh Deepaksingh Dudhane), ईश्वरसिंग धवलसिंग दुधाणे (Ishwarsingh Dhawalsingh Dudhane), शनिसिंग शक्तीसिंग दुधाणे Shanisingh Shaktisingh Dudhane (सर्व रा. डायस प्लॉट) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी व त्यांच्या दोन्ही सुना हे १० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पूर्वीचे डायस प्लॉट येथील घरी आले होते. आरोपींनी फिर्यादी यांना कशाच्या तरी सहाय्याने डोळ्याच्या वर डोक्यात मारले. भक्तीसिंग याने त्यांच्या डोळ्यावरील डोक्यावर मारुन खाली पाडले. ईश्वरसिंग याने त्यांच्या उजव्या हातावर मारले. शनिसिंग याने मानेच्या खाली पाठीवर मारुन दुखापत केली. पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर तपास करीत आहेत.

You may have missed