Pune Crime News | ‘माँटीला कोणी हात लावायचा नाही, नाहीतर बघा’ असे धमकाविणार्‍या तरुणाच्या डोक्यात बिअरची  बाटली फोडून खुर्ची फेकून   केले जखमी, धानोरीतील स्पाईस अफेअर हॉटेलमधील घटना

Pune Crime News | A young man who threatened 'No one should touch Monty, otherwise look' was injured by breaking a beer bottle on his head and throwing a chair, incident at Spice Affair Hotel in Dhanori

पुणे : Pune Crime News | मित्रांसह धानोरीतील स्पाईस अफेअर हॉटेलमध्ये जेवायला गेले असता काही जण मित्राला बोलत  होते, तेव्हा माँटीला कोणी हात लावायचा नाही, नाही तर बघा, असे धमकाविल्याच्या कारणावरुन गुंडाने त्या तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. खुर्ची फेकून मारुन जखमी केले.

याबाबत सागर सज्जन वंजारे (वय ४०, रा. मुंजोबा वस्ती, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनिष बन्सी ऊर्फ गुंड्या (Manish Bansi alias Gundya) व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धानोरीतील स्पाईस अफेअर हॉटेलमध्ये ८ मे रोजी रात्री सव्वा दहा वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर वंजारे हे राजु पांडु ठोंबरे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम पाहतात. ते  व राजू ठोंबरे धानोरीतील स्पाईस अफेअर या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथे त्यांचा मित्र कुंदन विश्वकर्मा (माँटी) हा सुद्धा त्यांच्या सोबत होता. ते हॉटेलमध्ये असताना दहा वाजता माँटीला त्याच्या मोबाईलवर फोन आल्याने तो फोनवर बोलत बाहेर गेला होता. त्यावेळी राजु ठोंबरे यांना माँटीने फोन करुन हॉटेल बाहेर बोलावल्याने त्यांच्याबरोबर वंजारे हेही बाहेर गेले. तेथे माँटीला काही मुले बोलत होते. तेव्हा फिर्यादी सागर वंजारे याने त्यांना “माँटीला कोणी हात लावायचा नाही, नाहीतर बघा,” असे म्हणाले. तेव्हा राजू ठोंबरे यांनी आपल काही नाही, तु हॉटेलमध्ये जा, असे सांगितल्याने ते एकटेच हॉटेलमध्ये जाऊन बसले. त्यावेळी काही कारण नसताना अचानक मनिष बन्सी ऊर्फ गुंड्या व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली. खुर्ची हातावर मारली. त्यावेळी राजू ठोंबरे व माँटी आत आल्याने मनिष बन्सी व त्याचे साथीदार गाडीवर बसून पळून गेले. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून पोलीस हवालदार माळी तपास करीत आहेत.

You may have missed