Pune Crime News | पुणे : निर्यातीच्या अमिषाने परदेशातील कंपन्यांची साडेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या मनीष रमणलाल गांधीवर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | परदेशात बासमती तांदुळ तसेच प्राण्यांसाठी खाद्य पदार्थ निर्यात करण्याचे आमिष दाखवुन परदेशी कंपन्यांची ४ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मनीष रमणलाल गांधी Manish Ramanlal Gandhi (वय ५०, रा. सोजस सार्थक अपार्टमेंट, अभिनव शाळेजवळ, एरंडवणे) यांच्यावर डेक्कन पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार कर्वे रोडवरील गणेश चेंबर येथील एमएसजीएल ट्रेडेक्स येथे जुलै २०२३ पासून आजपर्यंत घडला.
याबाबत मुंबईतील एका व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष गांधी यांनी फिर्यादी यांना ते रिजेक्टेड राईस व नॉन बासमती तादुंळ निर्यात करीत असल्याचे सांगितले. मिस्टर ट्युआंग यांचे सोबत एकूण ५ करार करुन त्यांच्याकडून ४ लाख ३४ हजार यु एस डॉलर घेतले. त्यानंतर फक्त दाखविण्यासाठी दीड लाख यु एस डॉलरचा मालाचा पुरवठा केला. राहिलेली २ लाख १९ हजार ६६ इतकी रक्कम परत केली नाही. मिस्टर ट्युआंग यांच्याशी वारंवार खोटे बोलून त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना माल न देता, त्यांची भारतीय रुपयांमध्ये २ कोटी ८ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केली.
दुसरी फिर्याद परदेशी कंपनीच्या वतीने पुण्यातील एका वकिलाने केली आहे. मनीष गांधी याने त्यांच्या एरंडवणे येथील गणेश चेंबर्समधील कार्यालयातून त्सुकीजी आय अॅन्ड टी थायलंड कंपनीस अॅनिमल कॉर्न फुड पाठवत असल्याचे सांगितले. त्यांच्याबरोबर परचेस अॅग्रीमेंट करुन कंपनीकडून अॅडव्हान्स म्हणून २ लाख ३८ हजार अमेरिकन डॉलर( २ कोटी २४ लाख ९५ हजार रुपये) घेतले. या रक्कमेचा अपहार करुन त्यांना कोणताही माल न पाठवता रक्कमही न देता त्सुकीजी आय अॅन्ड टी थायलंड कंपनीची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
