Parth Pawar | मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण; पार्थ पवार यांच्या कंपनीला 23 कोटी भरावे लागणार

Parth Pawar

पुणे : Parth Pawar |  मुंढवा येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला बुडविलेले २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि त्यावरील २ कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

उद्योग विभागाच्या इरादा पत्राच्या आधारे कंपनीने मुद्रांक शुल्कात सवलत मागितली होती. मात्र, सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात कंपनी अपयशी ठरल्याने ही मागणी फेटाळण्यात आली. परिणामी कंपनीला एकूण २३ कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

या प्रकरणात मुंढवा येथील बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ४० एकर सरकारी जमिनीच्या खरेदी व्यवहारात महसूल बुडविल्याचा आरोप आहे. अमेडिया एंटरप्राइजेसने आयटी पार्क उभारण्याच्या उद्देशाने उद्योग संचालनालयाकडून इरादा पत्र घेत मुद्रांक शुल्कात सवलत मिळवली होती.

नोंदणी महानिरीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार, कंपनीला ६० दिवसांच्या आत महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची संधी देण्यात आली आहे.

You may have missed