NEET Paper Leak Case | नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील ब्युटी पार्लर चालक महिला सीबीआयच्या ताब्यात

NEET Paper Leak Case | Pune beauty parlor operator woman in CBI custody in NEET paper leak case

पुणे : NEET Paper Leak Case |  देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता पुण्यापर्यंत पोहोचला असून, सीबीआयने पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट ७ च्या पथकाच्या मदतीने बुधवारी पहाटे सुखसागर नगर येथील ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेचा ताबा घेतला आहे. मनिषा संजय वाघमारे Manisha Sanjay Waghmare (वय ४६, रा. सुखसागर नगर, कात्रज) असे या महिलेचे नाव आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अहिल्यानगरमधून अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडे याला मदत करण्याचे काम मनिषा वाघमारे करत असल्याचा संशय आहे. विद्यार्थ्यांना आरोपींपर्यंत पोहोचवणे आणि ‘गेस पेपर’च्या माध्यमातून संपर्क घडवून आणण्यात तिची भूमिका असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

सीबीआयने तिच्या घराची झडती घेत मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले असून, त्यामधील चॅट, आर्थिक व्यवहार आणि संपर्कांची तपासणी सुरू आहे.

दरम्यान, नाशिकमधून शुभम खैरनार या विद्यार्थ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने १० लाख रुपयांना प्रश्नपत्रिका खरेदी करून ती पुढे १५ लाख रुपयांना विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून पुढे सुरू आहे.

You may have missed