Pune Crime News | खुनाच्या प्रयत्नातील 1 वर्षांपासून फरार गुंडाला बंडगार्डन पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | पूर्वीच्या भांडणाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात व पाठीवर वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकारातील गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या गुंडाला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे.
संगमेश्वर केरबा अर्जुने Sangameshwar Kerba Arjune (वय २५, रा. हडपसर रेलवे स्टेशनजवळ, जाधववस्ती, हडपसर) असे या आरोपीचे नाव आहे.
पूर्ववैमनस्यातून साहील राजू वाघमारे (वय २३, रा. तेरा ताडीवाला रोड) याला २९ मे २०२५ रोजी रात्री साडेदहा वाजता चौघांनी धारदार शस्त्राने डोक्यात, पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन राम गंगाधर क्षीरसागर (वय २५, रा. ताडीगुत्ता, मुंढवा), अकलम अली अकबर शेख (वय २२, रा. जाधव वस्ती हडपसर) यांना अटक करुन एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. यावेळी संगमेश्वर अर्जुन हा फरार झाला होता.
पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, प्रकाश आव्हाड यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संगमेश्वर अर्जुने हा मुंढवा येथे आहे. त्यानुसार पोलीस पथकाने मुंढवा येथे शोध घेऊन १३ मे रोजी रात्री ताब्यात घेऊन अटक केली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त संगीता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली आहे.
