Pune Crime News | आयुक्तांचा प्रशासकीय सचिव असल्याचे सांगून पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 16 लाखांना गंडा, पुणे महापालिकेच्या निलंबित कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | 16 lakhs duped by claiming to be the administrative secretary of the commissioner, promising a job in Pune Municipal Corporation, case registered against suspended employees of Pune Municipal Corporation

पिंपरी / पुणे : Pune Crime News | पुणे महापालिकेचे आयुक्त यांचा प्रशाासकीय सचिव असल्याचे सांगून पुणे महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरीच्या ६ जागांसाठी १६ लाख १८ हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पिंपरीतील एका ४४ वर्षाच्या व्यावसायिकाने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अशिष अशोक उबाळे Ashish Ashok Ubale  (वय ३८, रा. गणेश गार्डनजवळ, दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आशिष उबाळे हा पुणे महापालिकेत कामाला असून सध्या त्याला निलंबित केले असल्याची फिर्यादीचे म्हणणे आहे. हा प्रकार ७ ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिंपरीमध्ये व्यवसाय करतात. आशिष उबाळे हा त्यांच्या ओळखी आहे. त्याने फिर्यादी यांना भेटून सांगितले की, मी पुणे महानगर पालिकेत आयुक्त साहेब प्रशासन विभाग यांचा प्रशासकीय सचिव आहे. पुणे महानगर पालिकेत अनुकंपा तत्त्वावर  नोकरीच्या ६ जागा आहे. तुमच्या जवळच्या लोकांचे कल्याण होईल, असे सांगून कोणाला नोकरी पाहिजे असेल तर सांगा, असे म्हणाला. त्यावरुन त्यांचे ३ नातेवाईक , २ मित्र, मेव्हणा यांना क्लार्क व शिपाई पदावर नोकरी लावतो, असे आश्वासन दिले. त्यांच्याकडून १६ लाख १८ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर त्याने नोकरी लावली नाही. पैसे परत मागितल्यावर पैसेही न दिल्याने शेवटी फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश आटवे तपास करीत आहेत.

You may have missed