Pune Crime News | पुणे : हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटल बॉम्ब प्रकरणात MR पोलिसांच्या ताब्यात; बॉम्बमधील डिजिटल क्लॉकमुळे संभ्रम

Pune Crime News | Pune: MR in custody of police in Usha Kiran Hospital bomb case in Hadapsar; Confusion due to digital clock in bomb

पुणे : Pune Crime News |  हडपसर येथील उषा किरण हॉस्पिटलमध्ये आढळलेल्या बॉम्ब प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा एम आर असून तो एका इलेक्ट्रीक दुचाकीवरुन या हॉस्पिटलमध्ये आला होता. हडपसर येथील कामधेनु इस्टेटमधील उषाकिरण रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एक संशयास्पद बॉक्स आढळून आला होता. त्यात डिजिटल टाईमर लावलेला बॉम्ब सापडला. त्यानंतर पोलिसांनी परिसर तातडीने सील करुन ही वस्तू ताब्यात घेतली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने ही वस्तू ग्लायडिंग सेंटर येथे नेऊन तिचा स्फोट घडवुन आणून ती निकामी केली.

पोलिसांनी हॉस्पिटलमधील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून एक इलेक्ट्रीक दुचाकीवर आलेला एम आर संशयास्पद आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

चार जिलेटिन कांड्या एकत्र करुन हा बॉम्ब तयार करण्यात आला होता़ त्याला डिजिटल क्लॉक जोडण्यात आले होते़ त्यावर टाईम सेट करण्यात आला होता़ यामागे नेमके कारण काय आहे़ हॉस्पिटलमध्ये स्फोट घडवून आणण्यामागचे कारण काय याचा पोलीस शोध घेत आहे़

You may have missed