Pune Crime News | वडिलांनी शिफ्टने दिली रिक्षा, मुलाने ती चोरुन झाला फरार; धायरीमधील घटना

crime-logo

पुणे : Pune Crime News |  मालकाची रिक्षा मित्राला भाड्याने दिली होती. वडिलांपासून वेगळे राहणार्‍या मुलाने ही पार्क केलेली रिक्षा चोरुन घेऊन तो फरार झाला आहे. धायरीतील शिवमल्हार सोसायटीत ही घटना घडली.

याबाबत संजय नारायण शेडगे (वय ४४, रा. शिवमल्हार सोसायटी, धायरी) यांनी सिहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश नितीन जावडेकर (वय २२) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र नितीन कुमार जावडेकर यांनी सुरेश पिराप्पा मोटे (रा. जनता वसाहत, पर्वती) यांची रिक्षा संजय शेडगे यांना शिफ्टने चालवायला दिली होती. एक महिन्यापासून ते ही रिक्षा शिफ्टने  चालवितात. धायरीतील शिवमल्हार सोसायटीच्या समोरील रोडच्या कडेला ते रिक्षा नेहमी पार्क करुन ठेवतात. त्याप्रमाणे २९ एप्रिल रोजी पहाटे २ वाजता त्यांनी रिक्षा पार्क करुन घरी गेले. सकाळी साडेआठ वाजता पार्क केलेल्या ठिकाणी रिक्षा घेण्यास गेले. तेथे रिक्षा नव्हती. त्यांनी आजू बाजूला शोध घेतला तरी रिक्षा मिळाली नाही. त्यांनी ही बाब शिफ्टने रिक्षा देणारा त्यांचा मित्र नितीन जावडेकर यांना सांगितली. ते आल्यावर त्यांनी धायरी गाव, नांदेड सिटी, कोल्हेवाडी, किरकटवाडी, कात्रज तसेच पुणे शहर परिसरात शोध घेतला. परंतु, रिक्षा मिळून आली नाही. त्यानंतर त्यांनी आजूच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये पाहिले असता त्यांना रिक्षा शिफ्टने चालविण्यास देणारा त्यांचा मित्र नितीन जावडेकर यांचा मुलगा गणेश् जावडेकर यानेच ही रिक्षा चोरुन नेली. तो वेगळा रहात असल्याने तो कोठे राहतो, हे माहिती नव्हती. त्यांनी त्याला एक आठवडा फोन केले. परंतु, त्याने फोन उचलले नाहीत. नंतर मोबाईल बंद करुन टाकला. रिक्षा न मिळाल्याने त्यांनी शेवटी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करीत आहेत.

You may have missed