Pune Crime News | घरातील 23 लाखांचे दागिने चोरुन नेणार्‍या केअरटेकरला विश्रांतवाडी पोलिसांनी सांगलीतील वाटेगावाहून केले जेरबंद

Pune Crime News | Vishrantwadi police arrest caretaker who stole jewellery worth Rs 23 lakhs from house from Wategaon in Sangli

पुणे : Pune Crime News | आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअर टेकरने घरातील २२ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. विश्रांतवाडी पोलिसांनी या केअर टेकरला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथून जेरबंद केले आहे.

स्नेहल सुभाष साळुंखे (वय २८, रा. पुणे स्टेशन, मुळ रा. सांगली) असे या केअर टेकरचे नाव आहे. तीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी ३ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

याबाबत अमोल विजय तेंडुलकर (वय ४२, रा. हरिगंगा सोसायटी, फुलेनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ ते १६ मे २०२६ दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपल्या आईची देखभाल करण्यासाठी स्नेहल साळुंखे याला केअर टेकर म्हणून नेमले होते. गेली ६ महिने तो त्यांच्याकडे काम करत होता. या दरम्यान त्याने घरात आई व्यतिरिक्त कोणी नसताना त्यांची नजर चुकवून घरातील एक एक सोन्याचे दागिने चोरुन नेऊ लागला. १६ मे २०२६ रोजी त्यांनी आईच्या कपाटात पाहिले असता त्यांचे दागिने दिसून आले नाही. त्याचवेळी स्नेहल साळुंखे हा आला नाही. तेव्हा त्यानेच हे दागिने चोरून नेले असावेत, असा संशय व्यक्त करुन अमोल तेंडुलकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यावर तो गावी पळून गेल्याचा संशय आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गावाकडे जाऊन त्याला पकडले. न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून चोरलेले दागिने कोठे ठेवले याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख करीत आहेत.

You may have missed