Pune Ravet Crime News | रावेत गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! बिष्णोई गँगच्या तिघांना उत्तराखंडमधून बेड्या; दोन कोटींच्या खंडणीसाठी मॉलवर झाडल्या होत्या आठ गोळ्या

Pune Ravet Crime News | Big action in Ravet firing case! Three of Bishnoi gang arrested from Uttarakhand; Eight bullets were fired at the mall for a ransom of Rs 2 crores

पिंपरी : Pune Ravet Crime News | रावेत येथील ए. जे. फर्निचर मॉलवर झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. आरजू बिष्णोई आणि कुलदीप कशिश गँगशी संबंधित तिघा आरोपींना उत्तराखंडमधून अटक करण्यात आली आहे. या गोळीबारामागे तब्बल दोन कोटी रुपयांच्या खंडणीचा कट असल्याचा धक्कादायक खुलासा तपासातून समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DYj4-S4p200

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रवीण राम निवास (वय २३, झज्जर – हरियाणा), पंकज कुलदीप राठी (वय २१, रोहतक – हरियाणा) आणि सागर अजय पाल (वय २१, सोनपत – हरियाणा) अशी आहेत.

१५ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रावेतमधील ए. जे. फर्निचर मॉल समोर दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार केला. आरोपींनी तब्बल आठ गोळ्या झाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर बिष्णोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी पोस्ट व्हायरल झाली होती.

घटनेचा तपास करताना पोलिसांनी विविध पथके तयार केली. सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांच्या गुंडाविरोधी पथकाने आरोपींचा इंदूर, चंदीगड, रोहतक आणि हरिद्वारपर्यंत पाठलाग केला. अखेर आरोपी उत्तराखंडमधील एका लॉजमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.

बुधवारी रात्री उशिरा आरोपींना विमानाने पुण्यात आणण्यात आले असून या प्रकरणाचा लॉरेन्स बिष्णोई गँगशी नेमका संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.

You may have missed