Pune Crime News | एकच प्लॉट दोघांना विक्री करुन दुसर्याच्या जागेत अतिक्रमण करुन जागेवर केलेले कंपाऊंड तोडून केले नुकसान, भारती विद्यापीठ पोलिसांनी 5 जणांवर केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | मांगडेवाडी येथील एकच प्लॉट दोघा दोघांना विक्री करुन दुसर्याच्या जागेत अतिक्रमण केले. त्यांनी जागेवर लावलेले कंपाऊंड तोडून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत नानासाहेब आत्माराम देवकर (वय ४५, रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ज्ञानोबा एकनाथ मांगडे Dyanoba Eknath Mangade (रा. कात्रज), वसंत धर्माधिकारी यांचा मुलगा, कमल सुरेश तनपुरे Kamal Suresh Tanpure (वय ६५, रा. मुंबई), विठ्ठल सुरेश तनपुरे Vitthal Suresh Tanpure (वय ३५, रा. मुंबई), चंदन लक्ष्मण राठोड Chandan Laxman Rathod (वय ४७, रा. आंबेगाव पठार) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मांगडेवाडी येथील सर्व्हे नं. १० मधील प्लॉट नंबर १ ते ५ मधील देवकर यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये २०२२ पासून घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब देवकर यांनी शामकांत नामदेव गायकवाड यांच्याकडून मांगडेवाडी सर्व्हे नंबर १० मधील प्लॉट नंबर १ मधील १ आर क्षेत्र २०१८ मध्ये खरेदीखत करुन घेतलेले आहे. त्यांनी प्लॉटिंग ले आऊट प्लॅन यातील खरेदी खत दस्त पाहणी करता मुळ जमीन मालक ज्ञानोबा मांगडे यांनी एकच जागा दुबार विक्री केल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले आहे. १९८८ ते २०१९ दरम्यान या जागेचे खरेदी विक्री व्यवहार झालेले आहेत. यावरुन ज्ञानोबा मांगडे यांनी प्लॉट नंबर १ व ३ हा प्रथम शामकांत गायकवाड व त्यानंतर वसंत धर्माधिकारी यांना तसेच प्लॉट नंबर ४ व ५ प्रथम रोहीदास खांदवे यांना नंतर राजेंद्र धर्माधिकारी यांना अशा प्रकारे एकच जागा दोनदा विक्री केली असल्याचे दिसून येते.
ही बाबत २०२१ रोजी नानासाहेब देवकर यांनी कमल तनपुरे यांचा मुलगा तसेच चंदर राठोड व वसंत धर्माधिकारी यांचा मुलगा यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी आम्ही जागा मालकाविरुद्ध तक्रार देणार नाही, व जागाही सोडणार नाही, अशी दमदाटी करुन फिर्यादी यांच्या जागेत तसेच त्यांचे सहकारी प्लॉट नंबर ३ डिप्परीकर, आडाव व प्लॉट नंबर ४ सुलभा चव्हाण, थोरात आणि प्लॉट नंबर ५ आप्पासो मोरे, महादेवी शेट्टी यांच्या जागेत अतिक्रमण केले. फिर्यादी यांनी केलेले कंपाऊंड तोडून आर्थिक नुकसान केले़ फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना त्यांच्या जागेमध्ये जाण्यास मज्जाव करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.
