Pune Crime News | धायरीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली एमपीडीए अंतर्गत कारवाई; एक वर्षे केले चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : Pune Crime News | धायरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे़ त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.
कुणाल शिवाजी पुरी Kunal Shivaji Puri (वय २०, रा. विश्व कॉर्नर, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. कुणाल पुरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०२४पासून वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पिस्तुल जवळ बाळगणे, दुखापत करणे, मारामारी करणे, चोरी करणे यासारखे गुन्हे त्याने केले आहेत. त्याच्या दहशतीमुळे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही.
नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी कुणाल पुरीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची छाननी करुन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कुणाल पुरी याला एक वर्ष चंद्रपूर कारागृहात ठेवण्याचे आदेश काढला. पोलिसांनी नुकताच हा आदेश त्याला बजावून कुणाल पुरी याची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या सुचनांप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, पोलीस अंमलदार अनिल बारड, प्रथमेश गुरव, कैलास केंद्रे यांनी केली आहे.त्याच्याकडे चौकशी केली असता, रिहाना हिच्या चारित्र्याविषयी रवी याला संशय होता. त्यातून त्यांच्यात भांडणे होत होती. ‘तु मला सोडून दे, नाहीतर मुलांना बोलावून तुला मारेन,’ अशी रिहाना त्याला धमकी देत होती. त्यातून त्याने रागाच्या भरात तिचा गळा दाबून खुन केला. त्यानंतर घराला कुलूप लावून तो पळून गेला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले.
