Pune Crime News | पुणे : काळेपडळ पोलिसांकडून तडीपार गुंडासह तिघांना अटक; दोन गावठी पिस्तुले, चार मॅगझीन आणि चार जिवंत काडतुसे जप्त

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | काळेपडळ पोलिसांनी तडीपार गुंडासह तिघांना अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, चार मॅगझीन आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. हेवन पार्क ते लक्ष्मी पार्क दरम्यानच्या रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांना हेवन पार्क परिसरात काही सराईत गुन्हेगार हत्यारांसह थांबले असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे, गिरिराज जगदाळे, अतुल पंधरकर आणि महादेव शिंदे यांना ही माहिती मिळताच पोलिस पथकाने परिसरात सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आकाश संतोष भारती Akash Santosh Bharti (वय २७, रा. महंमदवाडी रस्ता) आणि दीपक राम बिष्ट Deepak Ram Bisht (वय २०, रा. हांडेवाडी रस्ता) या दोघांना ताब्यात घेतले.

दरम्यान, पसार झालेला तडीपार गुंड गणेश बबन लोंढे Ganesh Baban Londhe (वय २५, रा. हडपसर) यालाही पोलिसांनी गुरुवारी अटक केली. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

You may have missed